मंगळवेढा; हॉटेल मालकाने गैरफायदा घेवून ३५ वर्षीय महिलेवर केला अत्याचार
________________________________________________
मंगळवेढा; (दै. पंढरी नगरी न्युज) : गैरफायदा घेवून तुझे फोटो नवर्यास व नातेवाईकास पाठवीन अशी ३५ वर्षीय महिलेस धमकी देवून इच्छेविरूद्ध वेळोवेळी बलत्कार केल्याप्रकरणी परमेश्वर आनंदा कोळी (रा.बठाण) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी तथा पिडीत महिलेने बालाजीनगर येथे आरोपीची २० गुंठे जमीन दि.२१/९/२०२१ रोजी करार करून घेतली होती.
दरम्यान, या जागेत पत्राशेड मारून सदर पिडीतेने हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. पिडीत महिलेच्या पतीचा २०२२मध्ये अपघात झाल्याने ते त्यांच्या गावी आईवडीलाकडे रहावयास होते. हॉटेलचा व्यवसाय पिडीत महिला एकटीच सांभाळत होती.