भोंदूबाबा शिवद्रोही धिरेंद्र शास्त्री यांचे निषेधार्थ पंढरपूरात काँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर कारवाईसाठी मोर्चा..

भोंदूबाबा शिवद्रोही धिरेंद्र शास्त्री यांचे निषेधार्थ पंढरपूरात काँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर कारवाईसाठी मोर्चा..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक कारवाईच्या मागणीसाठी पंढरपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पंढरपूर तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले .

यावेळी पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले की, ''छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यांच्याबद्दल भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री अपमानकारक बोलत असताना फडणवीस, गडकरी व मोहन भागवत यांना लाज वाटायला हवी होती, त्यांनी त्याला थांबवले पाहिजे होते. भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा अशास्त्री बरळला तरीही त्यावर या तिघा नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण असून महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण, महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्या विचारांनी देशाला व महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे विचारच संविधानातही आहेत. हाच विचार व छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व भाजपा व रा. स्व. संघाला मान्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने बदनामी करणे, त्यांचा अपमान करणे व महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करणे हे भाजपा व रा. स्व. संघाचे राष्ट्रीय धोरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या लोकांवर सरकारने त्वरीत कारवाई करावी.'' प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा करण्यात आला होता.

यावेळी शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग बागल ,सरचिटणीस सुहास भाळवणकर, प्रा. अशोक डोळ ,तालुका उपाध्यक्ष सादिक मुलाणी, पंढरपूर युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे ,शहराध्यक्ष संदीप शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलजार तांबोळी, देवानंद इरकल इ. उपस्थित होते.