यशस्वी युवा उद्योजक म्हणून श्री बबन पवार यांचा सन्मान

यशस्वी युवा उद्योजक म्हणून श्री बबन पवार यांचा सन्मान

-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ सातारा यांच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या जालना येथील महासंघाच्या राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२२ यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी आदर्श शिक्षक यशस्वी युवा उद्योजक यांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला.

याप्रसंगी श्री भगवत मोतीराव पवार यांची गेल्या बावीस वर्षांपासून सुरू असलेली वृत्तपत्र वितरकाची अखंडित सेवा तसेच एकत्रित कुटुंबातील अर्णव मेडिकल विश्वकर्मा फॅब्रिकेशन या व्यवसायामध्ये मिळालेली यशस्विता तसेच संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य आणि समाजामध्ये असणारी त्यांची प्रतिमा इत्यादीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य स्तरावरील यशस्वी युवा उद्योजक म्हणून महासंघाच्या वतीने यशस्वी उद्योजक त्यांचा गौरव करण्यात आला. शाल श्रीफळ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना सपत्नीक गौरविण्यात आले. यावेळी श्री बबन पवार यांनी राज्यस्तरावर समाजातील इतर छोटे मोठे व्यावसायिक यांना हाताशी धरून त्यांनाही उद्योग, व्यवसाय मध्ये कसे यशस्वी करता येईल यासाठी तयार केलेल्या समितीत आनंदाने कार्य करण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी या कार्यक्रमास श्री माननीय नामदार रावसाहेबजी दानवे - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी उपस्थित राहून कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री सदाशिवराव निवृत्ती हिवलेकर, प्रमुख पाहुणे श्री भारत सासणे - अध्यक्ष ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर - प्रख्यात साहित्यिक व विचारवंत आणि सर्व कार्यकारणी सदस्य व सभासद अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ सातारा व सर्व समाज बांधव जिल्हा जालना हे उपस्थित होते.