सहकार शिरोमणीच्या सभासदास ५० किलो साखर वाटप सुरु... पंढरपुर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ..

सहकार शिरोमणीच्या सभासदास ५० किलो साखर वाटप सुरु... पंढरपुर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ..

-------------------------------------------------------------------------------------


पंढरपूर;दै.पंढरी नगरी न्यूज  - सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणराव काळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सभासद साखर वाटप दुकानाचे उदघाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले....*

*यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक,डेप्युटी जनरल मँनेजर कैलास कदम,प्रतिभादेवी पतसंस्थेचे व्यवस्थापक शिवाजीराव आगलावे, प्रशासन आधिकारी डि.एम.कुंभार, स्विय्य  सहाय्यक नितिन देवकर,सभासद व कर्मचारी उपस्थित होते.*

*सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद , बिगर सभासद , ऊस पुरवठादार शेतकरी सवलतीच्या दरामध्ये प्रत्येकी ५० किलो साखर वाटप दि.१४ नोव्हेंबर २०२२ पासुन ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पंढरपूर व कारखाना साईट वरून विक्री केंद्रातून सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत सुरु करण्यात आले असून साखरेचे कुपन स्लिपबॉय मार्फत घरपोहोच करण्यात आले असल्याची माहिती व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी दिली..*