*सीमा चिंचोळकर यांना यंदाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*

*सीमा चिंचोळकर यांना यंदाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*

पंढरपूर (प्रतिनीधी) : येथील कवठेकर प्रशालेतील पर्यवेक्षिका सौ सीमा चिंचोळकर यांना यंदाचा दिला जाणारा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत शिक्षिका पुरस्कार नुकताच प्रदान  करण्यात आला. 
कोल्हापूर येथील अविष्कार फाउंडेशन इंडिया या संस्थेच्या वतीने सामाजिक. शैक्षणिक. कला व क्रिडा. वैद्यकीय. व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गेली 15 वर्ष कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 

आविष्कार फाउंडेशन इंडिया कोल्हापुर संस्थेने 2022 या यावर्षीचा दिला जाणारा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत शिक्षीका पुरस्कार पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेतील पर्यवेक्षिका सौ सीमा चिंचोळकर यांना नुकताच जाहीर करण्यात आला असून तो सोलापूर येथील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सीमा चिंचोलकर या शिक्षण क्षेत्रात   २९ वषे भरीव  अशी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच देण्यात आला. आविष्कार फाउंडेशन या नामांकित संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीमती अंजली बारसावडे यांनी चिंचोळकर यांचे अभिनंदन पर कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल देशमाने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक आर्वे होते. कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी गोकुळ मवारे . बापूराव जमादार. डॉ. भारत खंदारे. विनश्री निम्बर्गी. अविष्कार फाउंडेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेतील शिक्षिका सौ सीमा चिंचोळकर यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे  पालक व सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.