सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी समाधान घाडगे; व्हाईस चेअरमनपदी शिवाजी शिंदे.

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी समाधान घाडगे; व्हाईस चेअरमनपदी शिवाजी शिंदे.

--------------------------------------------------------------------------------

सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांची सर्वात मोठी राजकीय आर्थिक असणारी बाळे येथील माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थे च्या चेअरमनपदी समाधान घाडगे यांची तर व्हाईस चेअरमन पदी शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन चेअरमन समाधान घाडगे हे पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असून चळे येथील दर्लिंग विद्यालय येथे आपली सेवा बजावीत आहेत तर शिवाजी शिंदे ही करमाळा तालुक्यातील खामगाव येथील रहिवासी आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या निवडणुकीत पुणे विभागीय शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या सेवाभावी पँनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेली ७ वर्ष माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली या माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेने विना भ्रष्टाचार मुक्त कामकाज केले होते ,त्यामुळे दिनांक २० नोव्हेंबर रविवार रोजी मतदान १६ पैकी १४ जागा साठी मतदान झाले होते. आर्थिक मोठी उलाढाल असणाऱ्या संस्थेची निवडणूक झाली होती. सेवाभावी पॅनलच्या २ महिला उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होत्या या पतसंस्थेचे एकूण २४५२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी १०८ मते बाद झाली होती बाळे येथील मल्टीपर्पज हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उत्तर सोलापूर एस ए गावडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

या निवडणुकीत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे शिष्य माध्यमिक पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन तात्यासाहेब बागल यांच्या समविचारी स्वाभिमानी पॅनलच्या दारुण पराभव केला होता. निवडणूक निकाल स्पष्ट होतात सेवाभावी पॅनलचे विजयी उमेदवार व आमदार दत्तात्रय सावंत समर्थक  मतदारांनी यावेळी गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला .

सोलापूर येथील माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी समाधान घाडगे यांची तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल पुणे विभागीय माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते स्वागत पर सत्कार करण्यात आला .यावेळी पतसंस्थेचे नूतन चेअरमन समाधान घाडगे म्हणाले की, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी माझ्यावर चेअरमन पदाची जबाबदारी सोपवली असून जिल्ह्यातील ज्ञात अज्ञात मतदारांनी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या सेवाभावी पॅनलला हजाराच्या मताधिक्याने निवडून दिल्याने त्यांच्या विश्वासात पात्र राहून काम करणार असल्याचे यावेळी सांगितले.

यापुढे पतसंस्थेच्या सभासदांना निवडणुकीत दिलेल्या वचननामाप्रमाणे व्याजदरात १४% दरावरून यापुढे ८%सभासदांना व्याजदर प्रमाणे कर्ज दिले जाईल. तसेच  सभासदांसाठी पतसंस्थेमार्फत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविल्या जातील असे चेअरमन सुभाष घाडगे यांनी सांगितले.