डांबराच्या टिपाडावर चढून नामवंत वकीलाचे अनोखे आंदोलन..

डांबराच्या टिपाडावर चढून नामवंत वकीलाचे अनोखे आंदोलन..

___________________________________________________

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर - कुरुल रस्ता अनेक खेड्यांना जोडणारा आहे.या रस्त्यावरून ऊसाची तसेच इतर वाहनांची प्रचंड वाहतूक आहे. हा रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे. या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करा अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. पंढरपूरला जोडणारे सर्व रस्ते चांगले झालेले आहेत.मात्र अनेक वर्षांपासून मागणी करूनही हा रस्ता नव्याने डांबरीकरण केला जात नाही.

सदर रस्ता हा दुर्लक्षीत आहे.या रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या मागणीसाठी सुस्ते येथील विजयकुमार  नागटिळक वकिलाने दोन वेळा मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले होते. शासन स्तरावर सतत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे. वेगवेगळी आंदोलने करूनही मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही. अतिशय खराब आणि खड्डेमय रस्त्यामुळे लोकांचे आणि वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत.याकडे लक्ष्य द्यायलाच कोणी तयार नाही.

पंढरपूर कुरुल रस्त्याचे अंतर पस्तीस किलोमीटर आहे.या रस्त्याचे नवीन डांबरीकरणासाठी अडीसचे तीनशे कोटींची आवश्यकता आहे. सध्या हा रस्ता अतिशय जिंर्ण मरणासन्न झालेला आहे. मोठा निधी उपलब्ध करून देऊन हा रस्ता पक्क्या स्वरूपात करून देणे आवश्यक असताना लोकांची ओरड पाहून सध्या या रस्त्यावरील खड्डे बुजविणेचे काम घाईगडबडीत उरकले जात आहे. फक्त मोठेच खड्डे बुजविले जात आहेत.

सदर रस्त्यासाठी शासनाने अठरा कोटींचा निधी उपलब्ध केल्याचे समजते. हा निधी अतिशय जुजबी आहे.अपुरा कांहीतरी निधी जाहीर करून शासनाने रडक्याचे डोळे पुसनेचा प्रयत्न केलेला आहे.या पंढरपूर कुरुल रस्त्याची अक्षरशः चाळन झालेली आहे.सध्या घाईगडबडीत बुजविलेल्या खड्डयाचे आयुष्य तीन चार महिनेच राहणार आहे.जड वाहतुकीमुळे सदर खड्डे पुन्हा उखडले जाणार आहेत.म्हणून एकदाच या पंढरपूर कुरुल रस्त्याचे नव्याने संपूर्णतः डांबरीकरण करून द्या .त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून द्या या मागणीसाठी सुस्ते येथील विजयकुमार नागटिळक वकील यांनी पुन्हा एकदा डांबराच्या टिपाडावर चढून अनोखे आंदोलन करून सरकारचे,संबंधित खात्याचे लक्ष्य वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे..या मागणीची पूर्तता व्हावी अशी मागणी रस्ता परिसरातील जनतेतून केली जात आहे..