मातोश्री ईश्वरम्मा विद्यालयाचे विद्यार्थी पंतप्रधान कार्यालय भारत सरकार परीक्षा स्पर्धेत यश

मातोश्री ईश्वरम्मा विद्यालयाचे विद्यार्थी पंतप्रधान कार्यालय भारत सरकार परीक्षा स्पर्धेत यश

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : पंतप्रधान कार्यालय भारत सरकार यांच्या मार्फत परीक्षा पे चर्चा या उपक्रमा अंतर्गत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत श्री. रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय पंढरपूर या प्रशालेतील क. निकिता दीपक कदम व चि. नागनाथ उमेश क्षीरसागर यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले बद्दल पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान (दादा) अवताडे यांचे शुभहस्ते सिंहगड पब्लिक स्कूलच्या सभागृहात प्रशस्तीपत्र, शिल्ड,पुष्पगुच्छ व रोख रक्कम प्रत्येकी रुपये २००० रु चे रोख बक्षीस देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

तसेच संस्थेच्या वतीने संस्था सचिवा सौ.सुनेत्राताई पवार मार्गदर्शक श्री.विजयसिंह पवार .जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सुनंजय पवार .प्राचार्या सौ. नंदिनी गायकवाड व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सह परिसरातून या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक पांडुरंग शिंदे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.