गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी रैयान तांबोळी विभागीय क्रीडा स्पर्धेत" गोल्ड मेडल ;ने सन्मानित

गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा  विद्यार्थी रैयान तांबोळी विभागीय क्रीडा स्पर्धेत" गोल्ड मेडल ;ने सन्मानित

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर;(दै पंढरी नगरी न्यूज) :  तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव चा रैयान तांबोळी विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विभागात गोल्ड मेडल,शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये नगर येथे विभागीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा रैयान तांबोळी यांनी सतरा वर्षीय वयोगटांमध्ये ४५ किलो वजन गटात विभागात प्रथम क्रमांक पटकावला त्याने पूर्ण नलॉकआउट सामना जिंकला यानंतरच्या पुढील स्पर्धा राज्य  स्तरांमध्ये होणार आहेत या स्पर्धेमध्ये रैयान तांबोळी घवघवीत यश संपादन केले याबद्दल संस्थापक अध्यक्ष तथा ग्रामपंचायत उपसरपंच गणपत मोरे यांनी  अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रैयान तांबोळी विभाग स्तरीय स्पर्धेतील विजयामुळे राज्य स्तरीय स्पर्धेसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या यशस्वी वाटचालीसाठी सहशिक्षक दिपक देशमुख, नागेश कांबळे, दस्तगीर शेख, राजेंद्र मोलाणे, नियाज मुलाणी, शितल मस्के, लीना बागल ,शीतल बागल, प्राजक्ता मस्के, वर्षा मोरे ,अजय मोरे व  ग्रामस्थ गादेगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले.