नवोदय विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..

नवोदय विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..

---------------------------------------------------------------------------------

तुळजापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : जवाहर नवोदय विद्यालयात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कुमारी मानसी मुरकुटे  हिने जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? तसेच या दिनाचे महत्त्व   सांगितले. या जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून विद्यालयामध्ये कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ मुलींच्या मध्ये आयोजित केल्या होत्या. कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक: तनिष्का मगर, द्वितीय क्रमांक : वेदिका गादेकर, तृतीय क्रमांक: भक्ती भोसले ,तर वरिष्ठ गटामध्ये मानसी मुरकुटे: प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक: अनुराधा भगत, तृतीय क्रमांक :अमरजा ढेपे या मुलीने मिळविला. या मुलींना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील सदन नायिका यांचाही गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला 

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य  गंगाराम सिंह यांनी विद्यालयातील सर्व अध्यापिका यांचा शाल ,गुलाब पुष्प व टिफिन देऊन  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी पौराणिक काळामध्ये देवा वरती देखील  संकट आले होते, त्यावेळी देवीने अवतार घेऊन आलेले संकट निवारण केले .तसेच सध्या घरातील पुरुषावरती आलेले संकट महिला कशा पद्धतीने निवारण करतात हे सांगून आजची महिला आई, बहीण, नणंद, मावशी, पत्नी म्हणून वेगवेगळ्या भूमिका कशा पार पाडत आहेत हे सांगून संयम व जिद्द यांचे प्रतीक म्हणजे महिला हे सांगितले. देशाचा विकाससाठी महिलांचा सन्मान, चांगल्या प्रकारची वागणूक त्यांचे अधिकार देण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. जी. जाधव यांनी केले .