आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघात विकास कामाच्याबाबतीत निधीची कमतरता भासणार नाही,

आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघात विकास कामाच्याबाबतीत निधीची कमतरता भासणार नाही,

------------------------------------------------------------------------------------
उद्घाटनाचा सपाटा (रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदींसाठी आपण निधी मागण्यास कुठे कमी पडू नका सभापती सोमनाथ मालक आवताडे
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मतदारसंघात सध्या रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदी कामांना भरघोस असा निधी आणून नुसता धमाक सुरू केला असून आज ११ एप्रिल रोजी पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील गुरुकृपा हौसिंग सोसायटी येथील दत्त मंदिरामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ भूमिपूजन सोहळा करण्यात आला. मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला .

यावेळी सभापती यांनी बोलताना सांगितले की आपण कामे मागण्यास कुठे कमी पडू नका आमदार आवताडे  माध्यमातून आम्ही कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान अवताडे यांनी मतदारसंघात अल्पवधी काळात जनतेच्या गरजा लक्षात घेता पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण आधी कामे करण्याचा सपाटा लावला आहे .आज आमदार आवताडे यांचे बंधू मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार  सभापती सोमनाथ  अवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यचा कायापालट करण्याचा मानस उरासी बाळगत पंढरपूर आणि मंगळवढा तालुक्यातील देखणा कायापालट करण्यासाठीं आपल्या मतदार संघात अल्प वधी काळातच  झेप भरारी घेत आमदार समाधान दादा आवताडे यांनी  विकासा कडे वाटचाल सुरू केली.

सदर प्रसंगी नगरसेवक  विवेक परदेशी, श्री.अदित्य फत्तेपूर, दिपक येळे ,.राहुल गावडे,पांडूरंग वाडेकर अर्बन बँकेचे संचालक एस. पी. कुलकर्णी सर, संचालक राजाभाऊ कौलवर,दत्त मंदिराचे अध्यक्ष डी. व्ही कुलकर्णी सर, ज्युनियर जॉनी लिव्हर रोहन लगस, हेमंत कुलकर्णी, योगेश भंडारकवठेकर, पत्रकार संकेत कुलकर्णी,गणेश दादा शिंदे नाईक, भाऊसाहेब शिंदे नाईक, संजय लवटे सर, रमेश कुंभार,सारंग कुंभार, बापू घोडके,गणेश सुरवसे, बाबु मांडवे, रविंद्र महागावकर, नाना निकम, गणेश देवमारे, भैया शिंदे रोहित सलगर, समर्थ तुळणुरे, अनिकेत तुल्ला व प्रभागातील  नागरिक उपस्थित होते.