तक्रार लाईनमनची ,,,बदली केली वायरमनची , विद्युत मंडळाचा अजब कारभार

तक्रार लाईनमनची ,,,बदली केली वायरमनची , विद्युत मंडळाचा अजब कारभार

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले २५० शेतकऱ्यांच्या सह्याचे  कार्यकारी अभियंता यांना निवेदन
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
  
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) पंढरपुर तालुक्यातील मौजे कौठाळी- शिरढोण विभागात वायरमन म्हणून कार्यरत असलेले वायरमन यांची बदली रद्द करावीअशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी बांधव यांनी पंढरपूर तालुका विद्युत मंडळाचे उप अभियंता विजय पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

लेखी निवेदनात म्हटले आहे की गेले अनेक वर्षे त्यांनी संबंधित वायरमन यांनी चांगले काम केले असल्यामुळे गावातील शेतकरी वर्गातूनही मोठ्या प्रमाणात बदली रद्द होण्यासाठी मागणी जोर धरीत आहे, सदर स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी हे विद्युत मंडळाची लाईट गेल्यानंतर ऑपरेटर कडे तक्रार करीत असतात ऑपरेटर हे  शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत अशी तक्रार शेतकऱ्यांनी लाईनमनच्या विरोधात केली होती परंतु विद्युत मंडळाने महाप्रताप केला असून लाईनमची बदली करण्याऐवजी येथील संबंधित वायरमन बदली करून इतिहासातील ध- चा- मा  केला असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.

सदर भाग नदीकाठचा असलेल्या ह्या भागात डीपी चे जास्त प्रमाण असून कौठाळी, शिरढोण दोन गावाचा लोड जास्त असल्यामुळे विद्युत पुरवठा कुठुन कसा गेला आहे,कोणत्या फिडरमधून कुठे लाईट जात आहे, एखाद्या डीपी जळाला किंवा शेतकऱ्यांची अडचण असेल तर त्या अडचणीला शेतकऱ्यांचा  फोन आल्यानंतर तात्काळ काम मार्गी लावण्यासाठी संबंधित वायरमन हे त्या ठिकाणी तातडीने पोहचत होते. त्यांनी कोरोना च्या किंवा आणीबाणीच्या काळात उन्हाळ्याच्या दिवसात ही शेतकऱ्यांना कधीही अडचण येऊ दिली नाही. वसूलीच्या बाबतही चांगल्या प्रकारचा वसूल केलेला आहे, त्यांच्या काळात कधीही अनुचित प्रकार घडलेला नसल्यामुळे शेतकरी वर्गातून बदली रद्द करण्याची मागणी होत असून आपण आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही करुन वायरमन ची बदली रद्द करावी ह्या मागणीचे निवेदन विद्युत मंडळाचे पर्यंत   उपअभियंता  विजय पाटील यांना देण्यात आले.

यावेळी स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेची जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे, सचिन पाटील,हरिभाऊ सलमपुरे,दत्ता नागटिळक हरि रानगर, इ.शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.