श्रीनाथ विद्यालय सोनके येथील विज्ञान शिक्षक शिकलगार सर यांची होमीओ भाभा विज्ञान शिक्षण केंद्र कार्यशाळेमध्ये निवड

श्रीनाथ विद्यालय सोनके येथील विज्ञान शिक्षक शिकलगार सर यांची होमीओ भाभा विज्ञान शिक्षण केंद्र कार्यशाळेमध्ये निवड

------------------------------------------------------------------------------------
शिक्षक बांधवाकडून अभिनंदनचा वर्षाव
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) : होमिओ भाभा विज्ञान शिक्षण केंद्र टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विज्ञान अध्यापनातील विविध नवं पद्धती नवनवीन संकल्पना स्पष्टीकरण चिकसक अध्ययन अध्यापन शालेय स्तरावरील विविध स्पर्धा यांची दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२२ ला होमिओ भाभा विज्ञान शिक्षण केंद्र विना पुरव मार्ग अणू शक्ती नगर मानखुर्द मुंबई येथे  दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये ५० विज्ञान शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात श्रीनाथ विद्यालय सोनकी येथील श्री जब्बार कासिम शिकलगार यांची निवड करण्यात आलेली आहे .त्यांची निवड झाल्याबद्दल सोनके गावातील ग्रामस्थ प्रशालेचे सर्व कर्मचारी मित्रमंडळी व संस्था त्यांचे अभिनंदन केले.*