मेरी मिट्टी मेरा देश अभियान स्व. संजय -सविता स्मृती वाचनालयात साजरा .
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश अभियान स्व संजय सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय कृष्ण नगर मंगळवेढा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
नेताजी सुभाषचंद्र बोस व क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पंचप्रण शपथ घेतली .पंचप्रण शपथ यांचे अनुवाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले. याप्रसंगी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांची चरित्रे ,स्वतंत्र लढ्यातील घडामोडी संदर्भातील संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शना चे उद्घाटन माजी नगरसेवक महादेव जिरगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाचा लाभ दिवसभरासाठी वाचकांनी घेतला.
कार्यक्रमास कैलास नवगिरे, मृगेंद्र स्वामी ,मयूर बागल, संतोष येनपे, संतोष जिरगे, सुरज नवगिरे, सुरेश पांचाळ ,आप्पा पांचाळ, विकास माने ,भगरे साहेब, विजय क्षीरसागर, ऋषिकेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संतोष जिरगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.