खिलारवाडी येथे कै. सोनप्पा पांडुरंग शिंदे यांच्या स्मरणार्थ वंचित घटकातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

खिलारवाडी येथे कै. सोनप्पा पांडुरंग शिंदे यांच्या स्मरणार्थ वंचित घटकातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

--------------------------------------------------------------------------------------


सांगोला( प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे कैलास सोनाप्पा पांडुरंग शिंदे यांच्या स्मरणार्थ भाग्यश्री ब्रास बँड पुणे श्री राज उर्फ दाजी शिंदे यांच्या वतीने उपेक्षित वंचित घटकातील नागरिकांना दीपावली सणाच्या निमित्ताने मोफत जीवनावश्यक वस्तूचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मारुती जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी बोलताना प्राध्यापक मारुती जाधव म्हणाले की ,अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे शहर येथे वास्तव्यास गेल्यानंतर आपल्या कष्टाच्या जीवावरती कोठ्यावधीची संपत्ती निर्माण करत असताना राजे शिंदे यांनी आपल्या मातीशी घट्ट नातं जिवंत ठेवला आहे काही सोनाप्पा शिंदे यांच्या कष्टाची जाणीव ठेवत स्वतः संपत्तीचा उपयोग घेण्यापेक्षा ती संपत्ती सर्वसामान्य रंजल्या गांजले यांच्या हितासाठी आपण वापरत आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो राज शिंदे यांचे गोरगरिबांच्या मुखात सुखाचा घास भरण्याची कार्य प्रेरणादायी आहे त्याचा इतरांनी आदर्श घ्यावा असे मत प्रा. जाधव यांनी सांगितले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला .

कार्यक्रमास सांगोला तालुका शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख नवल कुमार गाडे .खिलारवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंद्रकांत दादा बागल .दत्तात्रय शिंदे .राजू उर्फ दाजी शिंदे वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष महादेव शिंदे. प्रगतशील बागायतदार रामचंद्र तात्या बागल .गोपाळ बागल. तानाजी बागल। विक्रम बागल .बालाजी शिंदे .उमेश चव्हाण. संजय बागल .पळशी चे सुरेश पाटील. सागर भादुले इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.