खोमनाळ येथील कामसिद्ध सार्वजनिक वाचनालयात माझी माती माझा देश अंतर्गत पंचप्राण शपथ घेण्याचा कार्यक्रम साजरा...

खोमनाळ येथील कामसिद्ध सार्वजनिक वाचनालयात माझी माती माझा देश अंतर्गत पंचप्राण शपथ घेण्याचा कार्यक्रम साजरा...

------------------------------------------------------------------------------------*

मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज ) आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमा अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश अभियान श्री. कामसिद्ध सार्वजनिक वाचनालय खोमनाळ ता मंगळवेढा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
                         डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पंचप्राण शपथ घेतली पंचप्राण शपथ यांचे अनुवाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष साहेबराव शिंदे यांनी केले.

                        कार्यक्रमास सचिव दत्तात्रय बिले, सलीम सुतार, सोमनाथ माने, संकेत शिंदे, समाधान इंगळे, यश माने, आरव बिले, समर्थ पवार, रागिनी माने, रुक्मिणी नागणे, बालिका पवार, सुजाता बिले, सुप्रिया इंगळे, निकिता बिले, अंकिता बिले, स्वप्नाली शिंदे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार लिपिक अमित इंगळे यांनी मानले.
                       कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल करुणा मोहिते यांनी परिश्रम घेतले.