नेपतगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचे जि .प.सदस्य वसंतनाना देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील नेपतगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्या बांधकामाचे उदघाटन सोमवार दि. ४ रोजी कासेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा श्री .पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत (नाना) देशमुख यांच्या हस्ते फीत कापून तीन शाळा खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचा सत्कार नेपतगांव विविध विकास कार्य सोसायटीचे चेअरमन आनंदराव वाघ यांच्या हस्ते वसंत ( नाना) देशमुख यांचा स्वागत पर सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी लिगाडे यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मायाप्पा हेगडकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच रामभाऊ घोडके यांची आदर्श मल्हार सेनेच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काशिनाथ कोळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच आशाताई परकाळे, उपसरपंच सखुताई कदम ,ग्रामसेवक अमर मकर ,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मनीषाताई कदम, अशोक कदम, विकास सोसायटीचे सचिव बाळासाहेब बुधनेर, माजी पंचायत समिती सदस्य युवराज क्षीरसागर , भास्कर हेगडकर, नवनाथ कदम ,बंकू वाघ , राजू क्षीरसागर ,मेंबर वसंत परकाळे ,मेंबर आबा कदम ,ज्ञानेश्वर माऊली कदम ,आप्पा पाटील, दत्ता गडदे, अंगणवाडी सेविका ,जि .प .सर्व शिक्षक स्टाफ , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार आनंद भोपळे गुरुजी यांनी मानले.