खेड भोसे सोसायटीच्या ४०९सभासदांचा १७ ऑक्टोबर रोजी निर्णय सभासदांवर अपात्रतेची टांगती तलवार

______________________________________________

पंढरपूर;( प्रतिनिधी):- तालुक्यातील खेडभोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यक्षेत्राबाहेरील तब्बल ४०९ सभासदांना पंढरपूरच्या सहाय्यक निबंधकांनी नोटीस बजावली असून १७ ऑक्टोंबर रोजी आपले म्हणणे सादर करण्याची मुदत दिली आहे.

याबाबत पंढरपूरचे सहाय्यक निबंधक पी. सी. दूरगुडे यांनी सांगितले की, पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन, संचालक, सचिव यांनी नियमबाह्यपणे कार्यक्षेत्रा बाहेरील तब्बल सभासदांचा समावेश केला असल्याची तक्रार बंडू पवार, लक्ष्मण आबा पवार, बाबूराव भिवा पवार, राजाराम जमदाडे यांनी सहाय्यक निबंधकांकडे केली होती. या तक्रारी अर्जामध्ये सहाय्यक निबंधकांना तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा कार्यक्षेत्रा बाहेरील गावातील तब्बल ४०९ सभासदांना तसेच खेडभोसे  सोसायटीच्या चेअरमन, सचिव यांना सहाय्यक निबंधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११ अन्वये नोटीस पाठवली असून १७ ऑक्टोंबर रोजी स्वतः किंवा आपल्या वकीला मार्फत आपले म्हणणे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

त्यानुसार, कार्यक्षेत्रा बाहेरील ४०९ सभासदांना आपले खेडभोसे येथील रहिवासी असल्याचे तसेच गावामध्ये १० गुंठे पेक्षा जास्त जमीन असल्याचे सिद्ध करून दाखवावे लागणार आहे अन्यथा त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात येईल, असा इशारा या नोटीस मध्ये देण्यात आला आहे.

####################################

खेडभोसे सोसायटीच्या तत्कालीन     चेअरमन, संचालक आणि सचिव यांनी नियमबाह्यपणे कार्यक्षेत्र बाहेरील तसेच पंढरपूर तालुक्याच्या बाहेरील तसेच जमीन नसलेल्या लोकांना संस्थेचे बेकायदेशीर सभासदत्व दिले होते. याबाबत आम्ही पंढरपूरच्या सहाय्यक निबंधकांकडे कागदपत्रांची तक्रार दाखल केली होती. त्यावर आता १७ तारखेला सुनावणी होणार असून आम्हाला याबाबत योग्य तो न्याय मिळेल याची आशा आहे.

क्रारदार: बंडू दिगंबर पवार.

####################################