मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कारवाई ३ घरफोडीतील फरारी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या

मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कारवाई ३ घरफोडीतील फरारी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा(दै. पंढरी नगरी न्यूज) : मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण ,भुसे, हुलजंती गावातील नागरिकांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एक लाख ७० हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गेल्या ४ महिन्यापासून फरार असणारी आरोपी विजय छबू काळे वय. २३, रा.फंडशिरस ता. माळशिरस याला पकडून गजाआड करण्यात मंगळवेढा पोलिसांना यश मिळाले आहे.

या घटनेची हकीकत अशी दि.८ ऑगस्ट २०२२ रोजी हुलजंती येथील फिर्यादी जमादार महबूब उंब्रजकर हे राहत्या घराला कुलूप लावून आठवडा बाजारा करिता दुपारी १२ ते २ च्या दरम्यान गेले होते ही संधी साधून चोरट्याने कपाटात ठेवलेली सोन्याची दागिने चोरून नेले होते दरम्यान मंगळवेढा पोलीस स्टेशनचे धडाकेबाज पोलिस निरीक्षक रणजीत सिंह माने यांनी मंगळवेढा डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथकाचे नियोजन करून चोरीचा शोध घेतला असता आरोपी विजय काळे हा मिळून आला.

या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी करीत असतानाच भुशी येथील फिर्यादी शारदा उत्तम कोपे यांच्याही बंद घराचा कडीकोंडा तोडून कपाटात ठेवलेली सोन्याची दागिने चोरून नेले होते तसेच उसीठाण येथील फिर्यादी मसा धोंडीबा साखरे यांचीही घरफोडी केली होती. आरोपी व त्यांच्या साथीदाराने वरील तीन चोऱ्या केलेची कबुली दिली आहे .या गुन्ह्यातील २५ हजार रुपये किमतीची अर्धा तोळ्याची बोरमाळ वीस हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाची ठुशी ७५ हजार रुपये किमतीच्या तीन पिवळ्याच्या अंगठ्या ५० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे वेल झुमके व डोरले असा एकूण १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुदेमाल मंगळवेढा पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे .अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम धोपटे. पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे .दत्ता येलपले. पोलीस नाईक सुनील मोरे .पोलीस शिपाई अजित मिसाळ इत्यादी सदरची धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे मंगळवेढा पोलीस कर्मचाऱ्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.