शासकीय अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाईल्सवर जास्त प्रेम केंद्रीय मंत्री - नितीन गडकरी
---------------------------------------------------------------------------------------
पंढरी- नगरी न्यूज : एक लाख कोटीचा मुंबई- दिल्ली एक्सप्रेस वे दोन वर्षात पूर्ण करू शकलो. मात्र आपल्याच घरासमोरील एक किलोमीटर रस्ता प्रत्येक वर्षापासून पूर्ण होत नाही ,पर्यावरणाच्या नावाखाली शासकीय अधिकारी विविध विकास कामाच्या फाइल्स अडवून ठेवत आहेत .शासकीय अधिकाऱ्यांचे आपल्या पत्नी पेक्षा या फाईल्सवर जास्त प्रेम असल्याचा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खान विषयासंदर्भात आयोजित परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी लगावला.
विकास कामाच्या फाईल अनेक वर्ष अडवून ठेवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे ऑडिट व्हायला हवे ,असे ते म्हणाले आपल्या केळी बागेतील घरासमोरील रस्ता तयार करण्यासाठी ११ वर्षात ३० बैठका घेतल्या, तरी देखील हे काम पूर्ण होत नसल्याचे गडकरी यावेळी म्हणाले पर्यावरणाच्या नावावर अनेक विकास प्रकल्प थांबवण्यात आले असल्याचे विक्री म्हणाली विकास कामाच्या फाइल्सना परवानगी मिळण्यासाठी चा कालावधी निश्चित असावा त्यांचे डिजिटेलायझेशन व्हावे ,असे म्हणाले आम्ही म्हणू तसे सरकार ते चालणार,असे जर वन व वेकोलीची अधिकारी म्हणत असतील तर ते चालणार नाही, असे सांगत त्यांनी दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले वन विभागाकडे अनेक फाइल्स प्रलंबित आहेत .त्या तत्काळ मार्गे लावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा. अशा सूचनाही दिल्या काही आमदार, खासदार, आपल्या प्रभावाने विकास कामे थांबवतात, असा टोलाही त्यांनी लोकप्रतिनिधींना लगावला, ही परिषद घेण्यापूर्वी त्यांची टिपणी आम्हाला दिली असती, तर यावर चांगले चर्चा झाली असती काही निर्णय घेता आले असते ,असे म्हणत त्यांनी आयोजकांनाही चिमटे घेतले.
कार्यक्रमाला केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी .राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. खान मंत्री दादा भुसे .आमदार आशिश शेलार जयस्वाल इत्यादी उपस्थित होते.