गरजवंत मराठ्यांचा लढा पंढरपूर सकल मराठा समाज बांधवाची पंढरपुरात आज सोमवार दि.२० रोजी तातडीची बैठक

गरजवंत मराठ्यांचा लढा पंढरपूर सकल मराठा समाज बांधवाची पंढरपुरात  आज सोमवार दि.२० रोजी तातडीची बैठक

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज पंढरपूर शहर तालुका गरजवंत मराठ्यांचा लढा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा याची पुढील  दिशा ठरवण्यासाठी पंढरपूरमध्ये  रविवार दुपारी १.०० वाजता मीटिंग झाली.

उद्या सोमवार सकाळी १०.०० वाजता आंदोलन स्थळ तहसील कचेरी जवळ सर्व पंढरपूर शहरातील समाजबांधव, सर्व पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील समाज बांधव यांनी उपस्थित रहावे.

समाजाची भूमिका काय असेल त्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी सर्व समाजाचा एक मुखाने निर्णय घेण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

आता नाही तर कधीच नाही

जय जिजाऊ जय शिवराय