आदर्श शिक्षक प्रकाश मोरे, जनसंपर्क अधिकारी संजय क्षीरसागर यांचा मारापुरात सत्कार

आदर्श शिक्षक प्रकाश मोरे, जनसंपर्क अधिकारी संजय क्षीरसागर यांचा मारापुरात सत्कार

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्युज ) मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथील आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्रकाश मोरे गुरुजी व प्रा.संजय क्षीरसागर यांचा मारापुर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत पर सत्कार करण्यात आला .

यावेळी प्रकाश मोरे( गुरुजी )यांना पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने शैक्षणिक कामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने पंढरपूर पंचायत समितीच्या सभागृहात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते तसेच अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रा. संजय क्षीरसागर यांची नुकतीच विद्यापीठाने निवड केली आहे .आदर्श पुरस्काराचे मानकरी ठरलेले प्रकाश मोरे (गुरुजी) हे मंगळवेढा तालुक्यातील घरण्यांची येथील रहिवासी आहेत ते सध्या पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम पाहत आहेत.

प्रकाश मोरे (गुरुजी )यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंढरपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले .तसेच घरनिकीचेच येथील सुपुत्र असलेले तसेच पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात सामाजिक, शिक्षण, क्रीडा, राजकीय इत्यादी क्षेत्रात मैत्री पर संबंध जोडणारे प्रा. संजय क्षीरसागर यांची अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. मोरे गुरुजी व प्रा .क्षीरसागर सर या दोन्ही सुपुत्रांचा निवडीची दखल घेत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विनायक यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारापुर ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला . प्रकाश मोरे (गुरुजी) व प्राध्यापक संजय क्षीरसागर यांचे घरनिकी पंचक्रोशीत निवडीबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

यावेळी कार्यक्रमास मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार, उपसरपंच अशोक यादव, मारापुर विकास सोसायटीचे चेअरमन राजकुमार यादव ,मुख्याध्यापक हरिभाऊ घाडगे ,सिद्धेवाडी चे सुपुत्र तथा पिराची कुरोली येथे इंग्लिश स्कूल मध्ये कार्यरत असलेले नागनाथ जाधव (सर ),प्रकाश पाटील सर ,शिक्षक बंधू-भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.