गादेगावच्या शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विद्यार्थीचे एमटीएस परीक्षेत घवघवीत यश
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांचे एमटीएस परीक्षेमध्ये घवघवीत यश नुकतीच महाराष्ट्रभर पार पडलेली महाराष्ट्र राज्य टॅलेंट सर्च परीक्षा पंढरपूर येथे घेण्यात आली होती या परीक्षेमध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील 24 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले .यामध्ये ऋतुराज वैभव बागल हा पंढरपूर तालुक्यामधून सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर जान्हवी औदुंबर कांबळे दहाव्या क्रमांकाने तालुक्यामध्ये उत्तीर्ण झाली .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सर यांनी अभिनंदन केले.
यावेळी विद्यालयातील सहशिक्षिका शितल मस्के, वर्षा मोरे ,लीना बागल, शीतल बागल, सीमा रकटे, फरिदा पटेल, संतोष पवार, नागेश कांबळे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. अतिशय काठीण्य पातळीची असणारी ही परीक्षा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शिवरत्न शिक्षण संकुल नेहमीच आदर्श व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम करत असते ग्रामीण भागामध्ये चांगल्या नावारूपाला आलेली ही संस्था म्हणून ओळखली जाते.