तुळजापूर नवोदय विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा!
____________________________________________________
तुळजापूर;(दै पंढरी नगरी न्यूज) : तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री , भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर २०२२ "राष्ट्रीय शिक्षण दिवस" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे उपप्राचार्य श्री एस. व्ही. स्वामी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरती एस. डी. खोब्रागडे उपस्थित होते .तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी साईश शिंदे याने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्याची ओळख करून दिली .तसेच शिक्षक दिनेश वैरागडे सर यांनी सध्याची शिक्षण पद्धती यावरती प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासूवृत्ती, हे सर्जनशीलता निर्माण व्हावी या संदर्भात आपले विचार व्यक्त केले. तसेच शेवटी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री एस . व्ही. स्वामी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण दिनाची महत्त्व सांगून मौलाना अबुल कलाम यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून का साजरा केला जातो.
भारताच्या सांस्कृतिक विकासासाठी साहित्य अकादमी, कला अकादमी कशी स्थापन केली यावरती विचार व्यक्त करून जीवनात शिक्षणाचे महत्त्व किती आहे यावरती आपले विचार प्रकट केले. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एच. जी .जाधव यांनी केले.