विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पुजाऱ्याच्या धाडसामुळे देवीच्या पादुका चोरणारा पोलीसांच्या हवाली

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पुजाऱ्याच्या धाडसामुळे देवीच्या पादुका चोरणारा पोलीसांच्या हवाली

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिवार देवता पैकी एक असणाऱ्या श्री अंबाबाई देवी मंदिरातील पितळेच्या पादुका चोरून नेणाऱ्या चोरट्यास समितीच्या पुजाऱ्याने पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील आढीव  येथील बाळू मच्छिंद्र खाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती अशी की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत २८ परिवार देवता असून यापैकी चंद्रभागेच्या काठावर अंबाबाई देवीचे मंदिर आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे येथील पुजारी महेश दिलीप मंजरतकर हा सकाळी पूजा केल्यानंतर मंदिरातील परिसराची स्वच्छता करीत असताना देवीच्या समोरील पाच किलो वजनाच्या दर्शनासाठी ठेवलेल्या पितळी पादुका नसल्याचे त्याच्या लक्षात आले. सदर पादुकांचा शोध घेत असताना मंदिराच्या दरवाज्यातून एक व्यक्ती पळून जाताना मंजरतकर याने पाहिले. संशय आल्यामुळे त्याने सदर व्यक्तीचा पाठलाग करून त्यास महाद्वार येथे पकडले. सदर चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मंदिर समिती पुजाऱ्याने दाखविलेल्या धाडसामुळे सदर चोरटा जेरबंद झाला.