सोलापूरात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने भोंदू नागेश्वर बाबाचा जाहीर निषेध..... ◼️ सोलापुरातील मराठा समाज बांधव आक्रमक ,भोंदू बाबाच्या तोंडाला शेण फासू
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) नागपूर येथे झालेल्या जाहीर व्याख्यानात बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. अशा भोंदू बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे हा निषेध करण्यात आला.


यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. जी के देशमुख सर, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार , संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष साळुंखे मॅडम, जिल्हा कार्याध्यक्ष अभिंजली जाधव , स्वाती पवार, लता ढेरे, तसेच लक्ष्मण महाडिक, जीवन यादव, राजू व्यवहारे, लिंबराज जाधव, परशुराम पवार, राम माने, दत्ता जाधव , नितीन जाधव, नलवडे , सचिन चव्हाण, राजू व्यवहारे, राजू डोंगरे, रमेश जाधव, राजेंद्र भोसले, बिराजदार, राहुल जाधव, पलक जाधव, गजानन साळुंखे, राहुल भुसारे मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.