सिद्धेवाडीतील राजा वळूला मिळाला हिंदकेसरी चषकाचा पुरस्कार
------------------------------------------------------------------------------------
हिंदकेसरी मिळालेल्या राजा या वळूला पाहण्यासाठी सिद्धेवाडीत नागरिकांची मोठ्या प्रमाणात केली गर्दी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्युज ) : पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील रामचंद्र नाथा जाधव यांच्या राजा वळू बैलाचा मानाचा हिंदकेसरी चषक देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. शिर्डी येथे २३ मार्च ते २६मार्च रोजी तीन दिवस अखिल भारतीय पशु प्रदर्शन भरविण्यात करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये रामचंद्र जाधव रा. सिद्धेवाडी यांच्या चार जाती वळूला प्रथम क्रमांक देऊन हिंदकेसरी हा पुरस्कार देऊन चषक व रोख रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी सोलापूरचे पालकमंत्री तथा महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख उपस्थित होते. जाधव यांच्या राजा या वळू बैलाला या अगोदर कोल्हापूर येथील भीमा कृषी प्रदर्शनात कोल्हापूर येथील हुपरी चॅम्पियन, कनेर मठ चॅम्पियन १ ला क्रमांक इत्यादी विविध पुरस्कार तीन महिन्यात मिळाले आहेत. येथील रामचंद्र नाथा जाधव यांना कित्येक वर्षापासून पशु पालन करण्याचा नाद आहे. त्यांनी पूर्वी पाळलेल्या सोन्या या वळूलाही महाराष्ट्रात तसेच कर्नाटकात येथे अनेक पारितोषिके व बक्षिसे देण्यात आल्यामुळे त्यांच्या राजा व सोन्या बैलाचा सोलापूर जिल्ह्यात दबदबा निर्माण झाला होता.
सध्या हिंद केसरी मिळालेल्या" राजा" या वळूचे संगोपन करण्यासाठी लक्ष्मण जाधव, हनुमंत जाधव इत्यादी बंधू सतत धडपडत आहेत. रामचंद्र जाधव यांच्या राजा या वळूला शिर्डी येथे हिंदी केसरी चॅम्पियन पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरपूरचे माजी आमदार तथा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, मंगळवेढा येथील युटोपियन शुगर कारखान्याचे चेअरमन उमेशराव परिचारक, श्री पांडुरंगाचे संचालक तथा कासेगाव जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख, सिद्धेवाडी चे सरपंच सारंग जाधव यांनी अभिनंदन केले.