*यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र - संत दामाजी शुगरचे व्हाईस चेअरमन तानाजी (भाऊ) खरात यांचे मत:-*
पंढरपूर( प्रतिनिधी ) पंढरपूर येथील यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्या, गुरसाळे या संस्थेकडे शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी आपल्या ठेवी ठेवून आर्थिक व्यवहार केल्यानेच पतसंस्थेची पत शेतकऱ्यांमध्ये विश्वासाने राहिल्यामुळेच या पतसंस्थेची आर्थिक प्रगती चांगली असल्याने शेतकरी व ग्राहकांच्या विश्वासात पात्र असल्याचे मत संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात यांनी व्यक्त केली.
ते काही कामानिमित्त पंढरपूर येथे आले असता यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सदिच्छा भेट देण्यासाठी आले असता आपले विचार व्यक्त केले. यावेळी बँकेची आर्थिक प्रगती पाहून शेतकरी व ग्राहकांनी पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार मोठे असून ग्राहकांनी आपल्या ठेवी ठेवल्याने पतसंस्थेची प्रगती होण्यास चालना मिळाली असून ती आर्थिक विश्वास ठेवण्यास पात्र असल्याचे मत सदिच्छा भेटीदरम्यान व्यक्त केले.
यावेळी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी बापू साळुंखे यांनी संत दामाजी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बिभीषण दाजी पवार, मा. संचालक तानाजीराव जाधव ,बँकेचे शाखा अधिकारी सुनील देसाई मुडवी तालुका मंगळवेढा येथील अहिल्यादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश कोळेकर, जनकल्याण युवा मंचचे नेते कौठाळी चे सरपंच अनिल दादा नागटिळक, धोंडीबा मदने इत्यादी उपस्थित होते.