राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराचे मानकरी विनायक यादव यांचा मारापुरात जंगी सत्कार... ग्रामस्थांनी केलेला सन्मान माझ्याआयुष्यभर स्मरणात राहील - सरपंच यादव
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील मारापुर ग्रामपंचायतीचे सरपंच तथा,माणगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायक माधवराव यादव यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबदल ग्रामपंचायत , विकास सेवा सोसायटी व समस्थ ग्रामस्थ यांच्या संयुक्तविद्यामाने ग्रामपंचायत कार्यलयामध्ये सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विनायक यादव यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा पदभार घेतल्यानंतर पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना मारापुर तसेच वाडी वस्तीवरील नागरिकांच्या सोयी साठी विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून गावात मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला .ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय, सार्वजनिक शौचालय, वाडी वस्तीवर विद्युत पुरवठा करणे इ. अनेक विकास कामे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात उल्लेखनीय कामे केली आहेत म्हणून या सार्वजनिक व सामाजिक कामाची दखल घेऊन संस्थेने सरपंच विनायक यादव यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच गावातील विद्यार्थिनी जे .ई .ई परीक्षेमध्ये मध्ये प्राजक्ता सुभाष आसबे हीने घवघवीत यश संपादन केले बद्द्ल तिचा ग्रामपंचायतीच्यावतीने यांचे वतीने शाल,फेटा व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.तसेच नुकतेच देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले हरीचंद्र ज्ञानोबा माने यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, फेटा व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वि.का.से.सो. चेअरमन राजकुमार यादव,उपसरपंच अशोक आसबे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान आसबे, डॉ.शिंदे मॅडम, अभिमान जानकर, सोसायटी सदस्य आशोक यादव, नंदकुमार आसबे, अनिल माने, नवनाथ आसबे, भारत सातपुते, ग्रां.पं.सदस्य नाथा माने,भजंदास जानकर, निलेश आसबे, चैतन्य सातपुते, मंडल अधिकारी इंगोले भाऊसाहेब,सिद्धेश्वर माने, सिद्धेश्वर यादव, अमोल आसबे, प्रताप आसबे,भारत कोळी,सचिन माने, दत्ता यादव महाराज व ग्रामस्थ ,महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.