आज रविवारी मराठा सेवा संघ व डॉ. पंजाबराव देशमुख यांचे वतीने तालुका स्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर शहर व तालुका मराठा सेवा संघ व डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद पंढरपूर यांचे वतीने थोर समाज सुधारक व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नावे तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ सोहळा पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार शिवश्री दत्तात्रय सावंत सर व मिरजचे उपजिल्हाधिकारी शिवश्री उत्तमराव दिघे साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे.

तर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री तात्यासो पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. याप्रसंगी सेवापुर्ती निमित्त प्राथमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब काळे गुरुजी व महाराष्ट्र सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष मा. शिवश्री प्रशांत पाटील यांचा ही विशेष सत्कार संपन्न होत आहे. तर या कार्यक्रमासाठी पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश सचिव शिवश्री सुनील चव्हाण, प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवश्री तात्यासो यादव, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष (टी.डी.एफ.) शिवश्री पांडुरंग गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल श्री. विठ्ठल इन पंढरपूर येथे करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री नितीन उर्फ डी. डी. जाधव सर तसेच डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष शिवश्री हनुमंत जालिंदर भोसले यांनी पंढरी नगरी न्यूज च्या प्रतिनिधींना दिली.
तालुकास्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढील प्रमाणे :-
१) प्रा.शिवश्री राजाराम ज्ञानु गोडसे (के.बी.पी.कॉलेज पंढरपूर),
२)शिवश्री संतोष भिकाजी देशमुख (आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज करकंब),
३)शिवश्री पांडुरंग सुभाष कोकाटे (जि. प. शाळा कांबळेवस्ती फुलचिंचोली),
४) शिवश्री पांडुरंग सुखदेव कोरके (जि. प. केंद्रशाळा पांढरेवाडी)
५) शिवमती उमादेवी विठ्ठल नागटिळक (न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी)
६) शिवश्री गणेश कालिदास लटके (रेणुका विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बाभूळगाव)
७) शिवश्री सुग्रीव गणपत काळे (श्रीमंतराव काळे विद्यालय, जैनवाडी)
८) शिवश्री अनिल तुळशीराम गायकवाड (नगरपालिका प्राथमिक शाळा नंबर ,१२ पंढरपूर)
तरी या पुरस्कार वितरण समारंभास शिक्षक बंधू शिक्षीका भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.