मोबाईल च्या जमान्यातही ग्रामीण भागात वाचनालये आहेत तग धरून करमाळा तालुक्यातील रावगाव येथील वाचनालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम :

मोबाईल च्या जमान्यातही  ग्रामीण भागात वाचनालये आहेत तग धरून              करमाळा  तालुक्यातील रावगाव येथील वाचनालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम :

------------------------------------------------------------------------------------

करमाळा (पंढरी नगरी न्यूज ) हिंदु नववर्ष व गुढीपाडव्यानिम्मीत राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव ता . करमाळा या सार्वजनिक वाचनालयाने ग्रंथालयातील स्पर्धा परिक्षांची व निवडक ग्रंथाची गुढी उभारण्यात आली या नाविन्यपूर्ण गुढीचे पुजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगाव चे शाळा व्यवस्थापन सभितीचे अध्यक्ष भागवत बरडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचनालयाच्या वतिने असे नाविन्यपूर्ण उपक्रम सतत राबविण्यात येतात यामध्ये पुस्तकांची भिंत, भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा, शाळा दत्तक योजना, विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त त्यांचेवर लिखीत ग्रंथांचे प्रदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येतात सध्याच्या काळात मोबाईलने लहान मुलांच्या मनावर कब्जा मिळविला आहे परंतु हळू हळू मुलांना परत पुस्तकाकडे वळविण्याचा प्रयत्न या वाचनालयाच्या माध्यमातून चालूच आहे. याला मोठे यश येत आहे.

या कार्यक्रमानिमित्त शालेय विद्यार्थ्यी, तसेच  वाचक हबीब शेख, सुभाष काळे लक्ष्मण मोडके, राहुल पवार, प्रकाश कांबळे, हर्षद पवार, हेमंत पवार, उपस्थित होते उपस्थितांचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले कार्यक्रम यशष्वीतेसाठी प्रकाश कांबळे व राहुल पवार यांनी श्रम घेतले.