धैर्यशील मोहिते - पाटील लोकसभा लढवणाराच : --जयसिंह मोहिते - पाटील खासदार शरद पवार यांच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुतारी या चिन्हावर.

धैर्यशील मोहिते - पाटील लोकसभा लढवणाराच : --जयसिंह  मोहिते - पाटील खासदार शरद पवार यांच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुतारी या चिन्हावर.

-----------------------------------------------------------------------------------

अकलूज (पंढरी नगरी न्यूज )लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते - पाटील हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती माळशिरस तालुक्याचे जेष्ठ नेते जयसिंह (बाळदादा) मोहिते - पाटील यांनी दिली आहे.आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माढा, बारामती व कोल्हापूर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येवू शकत नाही. यासोबतच माण, करमाळा, माळशिरस व सांगोला या ठिकाणी विधानसभेला सुद्धा नक्कीच फटका बसणार आहे; असे मत जयसिंह (बाळदादा) मोहिते - पाटील यांनी व्यक्त केले.

अकलूज येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयसिंह  मोहिते - पाटील बोलत होते. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.