गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेज येथे राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा प्रशिक्षण शिबीर उत्साहाने सुरुवात

गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेज येथे राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा प्रशिक्षण शिबीर उत्साहाने सुरुवात

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेज मध्ये आजपासून राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा प्रशिक्षण शिबिर सुरू तीन मे पासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय सीनियर डॉजबॉल स्पर्धा बीड येथे होणार असून या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून संघ निवडण्यात आला आहे. यामध्ये 12 मुले व 12 मुलींचा समावेश आहे .या संघामध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील प्रेम बागल सानिका बागल यश मोरे माया बागल यांचा समावेश करण्यात आला आहे.

या टीम मध्ये जिल्ह्यातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पंजाब येथे पार पडलेल्या ऑल इंडिया जुनियर डॉजबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाने तिसरा क्रमांक मिळवला होता. यामध्ये शिवरत्न जुनिअर कॉलेजची सायली बागल स्पर्धेमध्ये ऑल इंडिया डॉजबॉल स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. जीमेल डॉजबॉल स्पर्धा बीड येथे होणार असून या स्पर्धेमध्ये आपला धबधबा कायम ठेवण्यासाठी सोलापूर सीनियर मुलांचा संघ व सिनियर मुलींचा संघ प्रयत्नशील राहणार आह.

यासाठी गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेज येथे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आला. यावेळी सर्व खेळाडूंना संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंना कोच म्हणून फिरोज पठाण हे काम पाहत आहेत.