स्व.रतनचंद शहा यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमीत्त संत श्री.दामाजी कारखाना कार्यस्थळावर अभिवादन...

स्व.रतनचंद शहा यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमीत्त संत श्री.दामाजी कारखाना कार्यस्थळावर अभिवादन...

-------------------------------------

मंगळवेढा(दै.पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व्हा .चेअरमन व रतनचंद शहा बँकेचे संस्थापक स्व .रतनचंद शहा शेठजी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील त्यांचे पुतळ्यास कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हा.चेअरमन तानाजी खरात व स्व. रतनचंद शहा बँक मंगळवेढाचे चेअरमन राहुल शहा यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .

सदर प्रसंगी चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले, या तालुक्यातील एकमेव सहकारी तत्वावर असणा-या संत दामाजी कारखान्याच्या उभारणीमध्ये स्व.रतनचंद शहा शेठजी यांचे मोलाचे असे योगदान लाभलेले आहे. स्व.रतनचंद शहा शेठजी यांनी संत दामाजी कारखान्याचे पाच वर्षे व्हाईस चेअरमन व पाच वर्षे संचालक म्हणून आदर्शवत असे काम केले होते. स्व.शहा शेठजी यांनी मंगळवेढा तालुक्याचे सामाजीक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. स्व।रतनचंद शहा शेठजी यांचे मंगळवेढा तालुक्यासाठी केलेले कार्य आपल्या स्मरणात चिरंतन राहणारे आहे.

सदर प्रसंगी व्ही .पी. शुगर तडवळ चे कार्यकारी संचालक श्री.के.आर.पाटील, व उत्कृष्ठ व्यवस्थापनाबद्दल धनश्री पतसंस्थेच्या कारखाना साईट शाखेचे मँनेजर सुधाकर कटे यांना शाल फेटा देवुन सत्कार करणेत आला.      

सदर प्रसंगी संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र।कार्यकारी संचालक रमेश जायभाय, यांचेसह बँकेचे किसन गवळी, मुझ्झफर काझी,चंद्रशेखर कोंडुभैरी, तसेच संतोष रणदिवे, अरुण किल्लेदार, वैभव ठेंगील, दादा डोंगरे, सचिन वडतिले,जमिर इनामदार,दादा पवार,महादेव जाधव सर कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, कामगार संघटनेचे, कामगार पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.