संजय गांधी योजनेतील निराधार व श्रावण बाळ निवृत्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना यापुढे पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार
------------------------------------------------------------------------------------
पंढरी- नगरी न्यूज : सोलापूर महाराष्ट्र शासन , सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाने राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नुकताच परिपत्रक जारी केले असून यापुढे दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक होते. यामुळे आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी ज्येष्ठांची धावपळ उडायची मात्र आता जेस्टांची ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाने पन्नाशी ओलांडलेल्या लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच दाखला द्यावा असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .यामुळे या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष व महिलां अनाथ मुले दिवंगातील सर्व प्रवर्ग कर्करोग ,एड्स ,कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा प्रपंच चालवू न शकणारे पुरुष व महिला, निर्धार विधवा ,घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व ध्येय विक्री व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी 35 वर्षावरील अविवाहित तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकलसेल ग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून दारिद्र्यरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व 21 हजार रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा देत अध्यादेश काढल्यामुळे लाभार्थ्या मधून आभार व्यक्त होत असून आनंदाचे वातावरण पसरले आहे.