आमदार समाधान आवताडे यांनी घेतले कोर्टी येथील जागृत देवस्थान शंभू महादेवाचे दर्शन, तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

आमदार समाधान आवताडे यांनी घेतले कोर्टी येथील जागृत देवस्थान शंभू महादेवाचे दर्शन,  तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे भाजपाचे मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील जागृत देवस्थान असलेले कोर्टी येथील श्री.शंभू महादेवाचे दर्शन घेऊन सर्व शिवभक्तांना आणि जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

राज्यातील बळीराजाला सुखी ठेवून पाऊस मोठ्या प्रमाणात बरसू दे अशी प्रार्थना आमदार आवताडे यांनी शिव चरणी केली.

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की ,कोर्टी येथील जागृत देवस्थान म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले शंभू महादेव या मंदिराच्या विकासासाठी तीर्थ क्षेत्र विकास निधीतून विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार अवताडे हे कोर्टी गावात आल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक द्रोणाचार्य हाके यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.

यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, परिचारक गटाचे पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण घोलप, मेंबर सरपंच राजू पवार ,उपसरपंच महेश शेडगे, पोपट हाके, शरीफ भाई शेख, दत्ता कोळेकर, दत्ता पाटील, संतोष डोंगरे, रोहित कदम, बिरूदेव मासाळ, गणेश गंगथडे, व इतर मान्यवर आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.