गोपाळपूर येथे अपघातात मंगळवेढ्याच्या बहिण- भावाचा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच अपघाती मृत्यू, पंढरपूर - मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर येथील कासार मळ्याजवळ सायंकाळी ४ वा .स्विफ्टकार व आयशरची समोरासमोर धडक विचित्र घटना

गोपाळपूर येथे अपघातात मंगळवेढ्याच्या बहिण- भावाचा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच अपघाती मृत्यू,  पंढरपूर - मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर येथील कासार मळ्याजवळ सायंकाळी ४ वा .स्विफ्टकार व आयशरची समोरासमोर धडक विचित्र घटना

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर- मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर येथे रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन्ही बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रक्षाबंधन सणाचा मुहूर्त काही तासांवर येऊन ठेपला असून बहीण भावाच्या नात्याचा सण साजरा करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. लाडक्या बहिणी गावाकडे जाऊन भावाच्या हातावर राखी बांधणार आहेत, तर भाऊ देखील आपल्या बहि‍णींकडे राखी बांधायला जात आहेत.                 

         बहीण- भावाच्या या प्रेमळ नात्यानं सोशल मीडियाही गजबजलेला पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच गोपाळपूर येथे अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये, रक्षाबंधन सणासाठी मंगळवेढाकडे घेऊन येणाऱ्या कारचा अपघात झाल्याने मंगळवेढा येथील बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.    

            रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन्ही बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.      

            पंढरपूर- मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कासार मळ्याजवळ स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण- भावाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी साडे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, जागेवरच कारमधील बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने उपस्थितांनाही गहिवरुन आले.

           पंढरपूरहून-मंगळवेढाकडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच 13 बी एन 6649 ची पंढरपूरकडे येत असलेला आयशर टेम्पो आर.जे.36 जी.ए 7971 ला समोरासमोर जोरदार धडक बसली. त्यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट कारमधील बहीण- भाऊ जागीच ठार झाले आहेत. नागरिकांनी अपघात ठिकाणी मोठी गर्दी केली होती. मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव (वय 25 वर्षे), ऋतुजा तात्यासो जाधव (वय 19 वर्षे) अशी मयत बहीण भावाची नावे आहेत. दोन्ही मृतांचे मतदेह पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येलाचा काळाने घाला घातल्याची घटना घडल्याने मंगळवेढा व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.