बार्शीच्या श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात हळदीकुंकवचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे आज संध्याकाळी ठिक ५-०० ते ८-०० वाजता. वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत वाचनालयाने वाचन संस्कृती जोपसण्यासाठी खास महिला वाचक सभासदासाठी हळदीकुंकु व वान म्हणून प्रत्येकीला एक रेसिपीचे पुस्तके, तीळगुळ देऊन त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांची पावले वाचनालय, ज्ञानमंदिराकडे वळावीत.नुसते चुल व मुल ही संकल्पना न रहाता.त्यानां वेगवेगळ्या विषयांवर अवांतर वाचन करता यावे,वाचनाची आवड निर्माण व्हावी,या साठी आमचे वाचनालय वाचकांसाठी व वाचक सभासदांसाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असते. नवनवीन योजना राबवल्या जातात.वाचनालयाचे पदाधिकारी व संचालक मंडळ हे नेहमीच अग्रेसर असतात.आज या हळदीकुंकु कार्यक्रमात जवळ जवळ ५० ते ६० महिलांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात शितल भंडारी, स्मिता कांकरिया, राजुल कांकरिया, राणी कांकरिया, हेमा कांकरिया, सपना कुंकूलोळ, सुनिता सुराणा, रक्क्षा डेडिया, सपना गुगळे, तृप्ती गुगळे, सुनिता रूनवाल, शितल कुंकूलोळ, अर्चना भंडारी, प्रिया गुगळे, मोना सुराणा, अमृता कुंकूलोळ, पुनम कोठारी, निता तातेड, दिपा कांकरिया, भावना कांकरिया, चेतना दुगड, प्रियंका श्रीमाळ, गौतमी श्रीमाळ, कोमल बोथरा, सुजाता मुथ्था, इत्यादी महिलांनी यात सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल- सुरेश यादव,सहा.ग्रंथपाल पल्लवी तौर,क्लार्क विराज पतंगे,सेवक रेखा यादव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी केले.