श्री संत दामाजी कारखान्याच्या सभासदांची दिवाळी गोड ऊस बिलाची संपूर्ण रक्कम खात्यावर जमा

श्री संत दामाजी कारखान्याच्या  सभासदांची दिवाळी गोड ऊस बिलाची  संपूर्ण रक्कम खात्यावर जमा

_____________________________________________________

मंगळवेढा प्रतिनिधी : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये गळीतास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकयांची एफ आर पी ची उर्वरित रक्कम रु ११०.८९ प्र मे टन प्रमाणे एकुण रक्कम रु ४.२७ कोटी संबंधीत शेतकयांचे धनश्री महिला पतसंस्था मंगळवेढा यांचे सर्व शाखातील खात्यावर वर्ग केले आहे  .कारखान्याचे गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी दिलेल्या शब्दाप्रमाणे हंगाम सुरु करण्यापुवी मागील ऊस बिलाची एफ आर पी पुर्ण  केली आहे.  तरी सर्व ऊस उत्पादक सभासद-शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास देवून सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

विद्यमान संचालक मंडळाने मागील हंगाम २०२१-२२ मधील हंगाम अखेरचे कालावधीतील कार्यक्षेत्रातील सभासद  व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन शेतकयांचे संपुर्ण ऊसाचे बिल रु  २१००/- प्र मे टन प्रमाणे एकूण रक्कम रुपये ८ कोटी ७५ लाख धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा व पतसंस्थेच्या सर्व शाखामध्ये यापुवीच वर्ग केले आहे  .तसेच मागील गळीत हंगामाचे उर्वरित ऊस तोडणी वाहतुक फायनल बिल रु १,६४,३२,४७०/- यापुवी जिजामाता महिला पतसंस्था, मंगळवेढा येथे संबंधीत ठेकेदारांचे खात्यावर जमा करणेत आले आहे . अशा प्रकारे मागील संचालक मंडळाचे काळात गळीतास आलेल्या ऊसाचे बिलापोटी यापूर्वी  रु  २१००/- प्रमाणे राहिलेली बिले अदा केली आहेत  तसेच एफ आर पी पूर्ण करण्यासाठी उर्वरित ऊस बिल रु ४.२७ कोटी शेतकयांच्या धनश्री पतसंस्थेतील बँक खात्यावर वर्ग केले असलेचे व्हाईस चेअरमन श्री तानाजी खरात यांनी सांगीतले.

सध्या सर्वत्र मोठया प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वच कारखान्यांचा हंगाम सुरु करणेस विलंब होत आहे . अशा परिस्थितीत आपले कारखान्याची ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सध्या कारखाना साईटवर आली असुन शेती विभागामार्फत ऊसतोडणी प्रोगाम तयार केला आहे. आजपासुन ऊसतोडणीच्या शेजा देण्यात आल्या आहेत  तसेच कारखाना गळीतासाठी तयार असुन उद्यापासुन पुर्ण क्षमतेने नाॅनस्टाॅप कारखाना चालु करणार आहोत  या हंगामामध्ये ६  लाख मे. टन गाळपाचे संचालक मंडळाने उध्दीष्ट ठेवलेले आहे . मा संचालक मंडळाने ठेवलेले उध्दीष्ट पुर्ण करण्यासाठी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख,कर्मचारी उत्सुक असलेचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी सांगीतले.
 
याप्रसंगी कारखान्याचे संचालक  श्री प्रकाश पाटील,  औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर,  ऊस उत्पादक सभासद-शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे कंत्राटदार, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.