पंढरपुर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा मिरवणुकीच्या माध्यमातुन प्रचार व प्रसार करणाऱ्या १० युवकांवर व मिरवणुक आयोजकावर गुन्हा दाखल पंढरपूर शहरात दहशत माजवून गुंडगिरी करणाऱ्यांना वटणीवर आणणार पंढरपूरचे नूतन डी .वाय. एस.पी प्रशांत डगळे
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर शहरामध्ये दिनांक ०९/०८/२०२५ रोजी नारळी पोर्णीमा निमीत्त मिरवणुक काढण्यात आलेली होती. सदरची मिरवणुक ही शांततेत चालु असताना काही युवकांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. २४४/२०१८ भा.दं. वि.सं. कलम ३०२, १२० (ब) इतर कलमान्वये दाखल गंभीर गुन्हयातील सरईत अटकेत असलेला आरोपी १) गोपाळ बाजीराव अंकुशराव रा .आंबे ता .पंढरपुर व जामीणावर असलेला आरोपी नामे २) संदीप पांडुरंग अधटराव रा .हनुमान मैदान पंढरपुर यांचे फ्लेक्सबोर्ड तयार करून त्यावर त्याचे फोटो हातात धरून प्रदर्शीत करून सार्वजनीक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवुन गाण्याच्या तालावर नाचत आरडा ओरडा करून दंगा करून जिल्हाधिकारी सोलापुर यांनी दिलेल्या आदेशाचा अवमान केला आहे तसेच दिलेल्या आदेशाचा भंग केला आहे म्हणुन यांचेवर पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.४९५/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम २२३,१८९ (२),१८३(३),१९१(२), ३७ (१), ३७(२) सह महा. पोलीस अधि. कलम ३७(१), (३),१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात आरोपी क. १) मनोज उर्फ मोनु प्रभाकर अधटराव २) अ.ब.क., ३) य.र.ल., ४) आप्पा जालींधर करकमकर, ५) शशिकांत समाधान करकरमकर ६) ऋतीक कल्याण काळे ७) दर्शन संतोष बंडगर ८) ऑकार कोळी ९) ओम कोळी, १०) राजु कवडे तसेच मिरवणुक आयोजक ११) गणेश मधुकर अंकुशराव १२) ज्ञानेश्वर बाबु कोळी सर्व रा. पंढरपुर
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे पंढरपुर उपविभाग पंढरपुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हॅबाडे, पोका ३१ कपिल माने, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोकॉ १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १३०४ दिपक नवले, पोकों ८०१ धनाजी मुटकुळे तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण चे पोकों रतन जाधव यांनी केली आहे.