पंढरपुरात अन्न -औषध प्रशासनाच्या नाकावर पानटपरी चालकाकडून कडून "चोरी चोरी, चुपके चुपके " नशिला माव्याची खुलेआम विक्री ◼️ नवरात्र महोत्सव सणासुदीच्या लगबगीत, अन्न औषध प्रशासन विभाग मात्र कोमात.. ◼️ या व्यवसायात १८ वर्षाखालील लहान मुलांचा वापर .. ◼️ झोपेचे सोंग घेतलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शहरात सुरू असलेला अवैद्य मावा, गुटखा, क्लोज- ओपन मटका पंढरपुरातून हद्दपार होणार का ? शहरातील नागरिकाकडून अपेक्षा

पंढरपुरात अन्न -औषध प्रशासनाच्या नाकावर पानटपरी चालकाकडून कडून "चोरी चोरी, चुपके चुपके " नशिला माव्याची  खुलेआम विक्री  ◼️ नवरात्र महोत्सव सणासुदीच्या लगबगीत, अन्न औषध प्रशासन विभाग मात्र कोमात..  ◼️ या व्यवसायात १८ वर्षाखालील  लहान मुलांचा वापर ..   ◼️ झोपेचे सोंग घेतलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शहरात सुरू असलेला अवैद्य मावा, गुटखा, क्लोज- ओपन मटका पंढरपुरातून हद्दपार होणार का ?  शहरातील नागरिकाकडून अपेक्षा

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने राज्य सरकारने गुटखा विक्रीस व सुगंधी पान तंबाखू बाळगण्यास बंदी घातली असताना पंढरपुरात मात्र ,चोरी चोरी, चुपके चुपके, या पद्धतीने गुटका व माव्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसत आहे.

पंढरपुरात गजबजलेल्या अशा अनेक ठिकाणी तसेच शाळा - महाविद्यालयाच्या परिसरात पान तंबाखू विक्री करणाऱ्या टपरी चालू करून हा व्यवसाय राजरोसपणे खुलेआम पणाने चालू आहे. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात पान तंबाखू मावा विकणाऱ्या चालकांनी आपले व्यवसाय सुरू केल्याचे दिसत आहेत शाळा ,महाविद्यालय परिसरात पान मावा गुटखा विक्री करण्यास बंदी असतानाही शासनाच्या या आदेशास पानटपरी चालक व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये मोठी अर्थपूर्ण मैत्री असल्याने शासनाच्या फतव्यास केराची टोपली दाखवल्याचे यावरून दिसत आहे. शहरातील जवळपास प्रत्येक गल्लीतील सर्वच ठिकाणी असणाऱ्या पान टपरी मध्ये सर्व कंपन्यांचा गुटखा व माव्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते काही ठिकाणी याला कोडवर्ड ठेवण्यात आलेला आहे. सुगंधी तंबाखूच्या नावावर दोन पुड्या एकत्र करून गुटखा तयार केला जातो गुटखा मावा व सिगरेट असे धूम्रपणाचे पदार्थ १८ वर्षाच्या खालील मुलांनाकडून विक्री करणे कायद्याने गुन्हा असताना व्यवसायिक हे पानटपरी मध्येही मुलांचे वय न पाहता त्यांना पान मावा गुटखा या वस्तूंची खुलेआम विक्री करण्यास भाग पाडतात .शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या दोनशे मीटर परिसरात पान तंबाखू विकणाऱ्या टपऱ्या असू नये असा नियम असताना अनेक शाळा महाविद्यालयाच्या लागूनच पान तंबाखू विकणाऱ्या टपऱ्या धारकांनी आपले दुकाने थाटली आहेत. पान मावा गुटखा खाणाऱ्यामध्ये शाळा, महाविद्यालयीन युवक, बेरोजगार तरुण, महिला कामगार मजूर, महसूल, कृषी, बांधकाम ,एस, टी महामंडळातील कर्मचारी ,विद्युत मंडळातील कर्मचारी, दूध व्यवसाय,सहकारी व खाजगी साखर कारखाना, खाजगी नामांकित कंपन्या इ. सरकारी नोकरदार अशा अनेक कर्मचाऱ्यांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे दिसत आहे . यामुळे अनेक वृद्ध - तरुण या व्यसनाची नशा करीत असल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. नशा करणारे तरुण प्रत्येक पानटपरी समोर दिसत आहे .

शासनाचे अनेक नियम असतानाही गजबजलेल्या किंवा पवित्र शाळा महाविद्यालय या ठिकाणीच क्लोज- ओपन मटका, तंबाखूजन्य मावा असे अनेक अवैद्य व्यवसाय थाटले जातात कसे असा नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होत असून पानटपरी चालक व अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी या दोघांच्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे प्रशासन मात्र सोईस्कर रित्या याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. देशामध्ये पंढरपूर हे नाव आध्यात्मिक नगरी समजलेल्या पंढरी नगरीला या अनेक अवैद्य व्यवसायामुळे बदनामी सहन करावी लागत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सध्या होत आहे.