तावशी- तनाळी रस्त्यावरील हॉटेल रानवारा येथे तालुका पोलिसांची कारवाई ◼️ हॉटेल मालकाकडून 8000 रुपयाचा अवैध दारू साठा जप्त ◼️ यापुढेही अवैधव्यवसायिकावर कडक कारवाई करणार- पोलीस निरीक्षक मुजावर
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज)पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आगामी रंगपंचमी या उत्सवाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे तावशी- तनाळी रोडवरीलयेथील रानवारा हॉटेल तसेच गुरसाळे, देगाव , कासेगाव या गावात पंढरपूर तालुका पोलिसांनी छापा करून एकूण 8210 आठ हजार दोनशे दहा रुपयांची अवैध दारू जप्त केलेली असून त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी .वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार साळुंखे गावडे, बाजीराव काकडे, संजय गुटाळ, सतीश चंदनशिवे, तात्यासाहेब गायकवाड परशुराम शिंदे. यांच्या पथकाने कारवाई केली आहे.