तारापूर येथील हॉटेल रविराज वर पोलीसांची धडक कारवाई ◼️ 16 हजार रुपयाची अवैध दारू जप्त , ◼️ ग्रामीण पोलीस स्टेशन कडून तालुक्यात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राइक, हाँटेल व्यवसायिकामध्ये मोठी खळबळ

तारापूर येथील हॉटेल रविराज वर पोलीसांची धडक कारवाई    ◼️ 16 हजार रुपयाची अवैध दारू जप्त ,  ◼️ ग्रामीण पोलीस स्टेशन कडून तालुक्यात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राइक, हाँटेल व्यवसायिकामध्ये  मोठी खळबळ

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आगामी रंगपंचमी या उत्सवाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तारापूर- सुस्ते रोडवर हॉटेल रविराज या ठिकाणी पंढरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून एकूण 16 हजार रुपयांची देशी विदेशी दारू, बियर असे एकूण 16 हजार रुपयांची अवैध दारू जप्त केलेली असून त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी .वाय. मुजावर, API शहाजी गोसावी, श्रीमती रेळेकर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार परशुराम शिंदे, ब्रह्मदेव काळे, संतोष चव्हाण, गावडे, संजय गुटाळ, सतीश चंदनशिवे यांच्या पथकाने कारवाई केली आहे .या कडक कारवाईमुळे ग्रामीण भागातही अवैद्य व्यवसायिकामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.