पंढरपूर तालुक्यात अनुचित दुर्घटना घडू नये याकरीता कलम 163 लागू , पंढरपूरचे तहसीलदार :- सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यात अनुचित दुर्घटना घडू नये याकरीता कलम 163 लागू ,   पंढरपूरचे तहसीलदार  :- सचिन लंगुटे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज):- पंढरपूर तालुक्यातील बंद पडलेल्या पावसाच्या पाण्याचा साठा झालेली शेततळे, दगडखाणी, निर्जन नदी किनारा, तलाव, कालवा, मोठी डबकी व जेथे जेष्ठ नागरिक, छोटी मुले, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी कपडे धुण्यासाठी व पोहण्यासाठी जातात, अशा ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी दि. 15 जून पर्यंत 2026 या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.

सन- २०२६ मध्ये शाळांना उन्हाळयाच्या सुट्टया लागल्यानंतर मुले पोहायला जातात. अशा धोकादायक ठिकाणी कोणी जाणार नाही याकरीता धोक्याच्या सुचनांचा फलक दर्शनी भागात लावावा. तसेच कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या पावसाच्या पाण्याचा साठा झालेल्या दगडखाणी, निर्जन नदीकिनारा, तलाव, कालवा, मोठी डबकी अशा ठिकाणांचा शोध घेऊन उक्तं प्रमाणे अनुचित दुर्घटना घडू नये याकरीता त्या परिसरामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (पुर्वीचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144) लागू करणे आवश्यक असल्याने याबाबतचे आदेश तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सचिन लंगुटे यांनी निर्गमित केले आहेत.