आता काय करावं..! पतीचे नाव आणि आडनावही एकच, सगळाच गोंधळात गोंधळ.
-------------------------------------------------------------------------------------
भंडारा( दै.पंढरी नगरी न्यूज) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. प्रचारतोफा आज सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. तोपर्यंत हा धुरळा उडत राहील.५ वाजता जाहीर प्रचार थांबणार असला तरी खरा प्रचार त्यानंतर सुरू होणार आहे. आज आणि उद्या रात्रीतच सर्व घडामोडी होणार आहेत. अशा परिस्थितीत भंडारा तालुक्यातील ओपारा गावात मात्र दोन उमेदवारांच्या पतीचे नाव आणि आडनाव सारखेच असल्यामुळे चांगलाच गोंधळ उडत आहे.
एकच आडनाव आणि पतीचे नाव सारखे असणाऱ्या दोन वेगळ्या महिलांमध्ये सरपंच पदाची निवडणूक होत आहे. ओपारा गावात डोके चक्रावणारा प्रकार घडला आहे. मतदार संभ्रमात पडले आहेत. पल्लवी राहुल राऊत आणि रश्मी राहुल राऊत यांच्यात थेट लढत होत आहे. पण पतीचे नाव आणि आडनाव एकसारखे असल्यामुळे प्रचार करताना दोन्ही गटांची चांगलीच तारांबळ उडत आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी आडनाव वेगळी ओळख निर्माण करणारे असते. मात्र जर एकच आडनाव आणि पतीचे नावही सारखे असेल तर... मग मतदारांचे डोके चक्रावणारच. अशी निवडणूक भंडारा जिल्ह्यात होत आहे.
भंडारा जिल्हातील लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. ओपारा गावात आडनाव आणि पतीचे नाव सारखे असणाऱ्या दोन वेगवेगळ्या महिलांमध्ये सरपंच पदाची निवडणूक होत आहे. पल्लवी राहुल राऊत आणि रश्मी राहुल राऊत यांच्या थेट लढत होणार आहे. त्यामुळे ओपारा गावातील मतदार संभ्रमात पडले आहेत. भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सरपंच थेट जनतेतून निवडले जात असल्याने अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
सरपंचासह एक ग्रामपंचायत बिनविरोध
काही गाव पुढाऱ्यांनी आरक्षणामुळे त्यांना निवडणूक लढता येत नसल्याने आपल्या पत्नीला उभे केले आहे. लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावात सरपंच पदासाठी दोन महिला एकमेकींसमोर उभ्या आहेत. ही निवडणूक उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची असली तरी, ग्रामस्थांना चक्रावून टाकणारी ठरत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता या सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या महिला उमेदवारांबाबत मजेशीर आणि योगायोगांच्या किस्स्यांची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.