भोसे( कं)येथे राजमाता जिजाऊ जयंती चिमुकली विद्यार्थ्यांनी वैष्णवी व्यवहारे हिच्या सुरेल गायनाने साजरी..

भोसे( कं)येथे राजमाता जिजाऊ जयंती चिमुकली विद्यार्थ्यांनी वैष्णवी व्यवहारे हिच्या सुरेल गायनाने साजरी..

----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) : यशवंत विद्यालय भोसे(कं) तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आज  विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळेस व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक  कारंडे सर ,उप मुख्याध्यापक  साळुंखे सर, पर्यवेक्षक शिंदे सर , उबाळे सर,  भोसले सर , खैरे सर, व  कनाके सर, व्यासपीठावर उपस्थित होते. सभेचा मुख्य कार्यक्रम शेवटच्या दोन तासाला आयोजित करण्यात आला. त्यावेळेस अध्यक्षपदी  ढेरे जे एस यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष निवड माने आर.डी. व  बोराडे जी .के. यांनी केली.

कु. समृद्धी पुरुषोत्तम पाटील. कुमारी समृद्धी सचिन माने या दोन विद्यार्थिनींनी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. तर कुमारी देशमुख, संस्कृती भिंगारे श्रावणी, सार्थक कवडे, यश आखाडे, जमदाडे पार्थ, यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विषयी भाषण केले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी देवकर अभिनव  विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला.

कु.व्यवहारे वैष्णवीदेवी व्यंकटेश (पाचवी ड) मधील विद्यार्थिनीने राष्ट्रमाता राजमाता  जिजाऊ यांच्या जीवनाविषयी व शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार याविषयी अर्थपूर्ण  भाषण केले. तसेच जिजाऊ  वंदना चे सुरेख गायन केले.

कु.वैष्णवीदेवी  व्यवहारे ने केलेले भाषण व गायन पाहून  करळे सर व  ताटे मामा यांनी प्रत्येकी शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले.  ढेरे सर यांनी अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाच्या कार्याचा आढावा घेतला. पर्यवेक्षक शिंदे के.डी. सर यांनी सर्वांचे आभार मानले.