पंढरपूर येथील रुक्मिणी विद्यापीठात विविध उपक्रमाने कार्यक्रमाची सांगता..

पंढरपूर येथील रुक्मिणी विद्यापीठात विविध उपक्रमाने कार्यक्रमाची सांगता..

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : ग्रामीण भागातील महिलांच्या मध्ये कायदा, आरोग्य व ग्राहक मंचाची जागृती होण्याच्या दृष्टीने श्री रुक्मिणी विद्यापीठाने तिचं माझं व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी टाकळी येथील प्रताप नगर मध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे शुभ हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन करताना‌ अँड. धनश्री साठे म्हणाल्या की पुरुषप्रधान संस्कृतीत कायद्याने महिलांना सुद्धा समान अधिकार दिले असून हुंडाबंदी प्रतिबंधक, कौटुंबिक छळ पुरुष याविरुद्ध असलेल्या  कायदा तसेच विशेष विवाह कायदा याबाबत विस्तृतपणे माहिती देत जिल्हाधिकारी महिला समन्वय समिती याबाबत मोफत मार्गदर्शन व वकिली करत असल्याचे सांगितले.

तर ग्राहक मंच याविषयी मार्गदर्शन करताना साहित्यिक, कवी व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या शोभना सगर म्हणाल्या की दैनंदिन जीवनात उपयोगी पडत असलेल्या वस्तू खरेदी करत असताना प्रत्येकाने हक्काने कॅश मेमो पावती बरोबर वाॅरंटी व गॅरंटी कार्ड घेण्याचे आवाहन केले तर वस्तूमधील भेसळ कशी ओळखावी हे सोप्या भाषेत कथन करून सांगितले ग्राहक मंचासमोर कशी तक्रार करावी याबाबत ही मार्गदर्शन केले.

तसेच महिलांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन करताना डाॅ. पूजा जमदाडे म्हणाल्या की दैनंदिन जीवनात महिलांनी कॅल्शियम व प्रोटीन ची गरज पाहता दररोज दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे सकाळच्या सूर्यप्रकाशात चालणे ठेवून पालेभाज्यांचा ही रोजच्या जीवनात उपयोग करून स्वतःसाठी तीस मिनिटे वेळ देऊन योगा व चालणे नित्य नियमाने ठेवावे व साचेबद्ध व आनंदी जीवन जगण्याचे सांगितले उपाशीपोटी कोणतेही उपास न करता फ्रिज मधल्या वस्तू न वापरण्याचा सल्ला दिला. व सकस आहार सेवन करावा असे सांगत आपली आई आपणच बना, शिका व मुलांना शिक्षण व सुसंस्कृत बनवा असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात सुनेत्राताई पवार म्हणाल्या की मुलगी वयात येताना तिच्याशी जवळीकता वाढवून तिची मैत्रीण बना मुली मधील गुण ओळखून त्याची पावलं शोधा व त्याप्रमाणे तिला मार्गदर्शन करा. तिचं माझं व्यासपीठ या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या महिलांच्या विविध स्पर्धेत पुढील महिलांनी यश संपादन केले एक मिनिट्स स्पर्धेत प्रथम जयश्री वास्ते व रूपाली कदम द्वितीय समिना शेख व शीला पवार , दोरी उड्या प्रथम प्रियांका कदम द्वितीय रेणुका परीट ,पाककला प्रथम प्रियांका कदम, वेशभूषा प्रथम अनिता कवडे ,संगीत खुर्ची प्रथम संजना पाटील यांनी यश संपादन केले तर या यशस्वीतांना मान्यवरांचे शुभ हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमासाठी विजयमालाताई वाळके. सरपंच लक्ष्मी टाकळी, र शारदा राजभोज, रोहिणी देशपांडे, नंदिनी गायकवाड प्राचार्या, संतोष कवडे मुख्याध्यापक सागर सोनवणे, नंदकुमार वाघमारे ग्रामपंचायत सदस्य व अवधूत पोतदार यांचे सह शेकडो महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभावरी डुबल व आलनदीप टापरे यांनी केले तर आभार सविता लोखंडे यांनी माणले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके, फरहणा कादरी, कुमोदिनी सरदार, मनीषा पाटील, वैशाली कदम, सुवर्णा जगदाळे, जयश्री खडतरे, अश्विनी गोमटे यांनी विशेष परिश्रम घेतले.