नवोदय विद्यालयात पराक्रम दिवस साजरा..

नवोदय विद्यालयात पराक्रम दिवस साजरा..

_______________________________________________

तुळजापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) :  तुळजापूर तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस २३ जानेवारी २० २३ पराक्रम दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री. गंगाराम सिंह यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे औचित्य साधून  मास्टर अस्मोल गायकवाड या विद्यार्थ्याने पराक्रम दिवसाच्या विषयी कवितेचे वाचन केले .

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी स्वातंत्र्य संग्रामात सुभाषचंद्रजी भोस यांचे कार्य कसे महान होते तसेच त्यांचे विचार कसे ऊर्जावान होते. हे सांगून त्यांचे विचार आचरणात आणावे अशा प्रकारचे  आवाहन विद्यार्थ्यांना केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एच .जी .जाधव यांनी केले.