*राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोलापूर व अहमदनगरचे पालकत्व:-**

*राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोलापूर व अहमदनगरचे पालकत्व:-**

----------------------------------------------------------------------------

मुंबई प्रतिनिधी:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील रेंगाळलेल्या पालकमंत्री पदाची निवडी जाहीर केल्याने संबंधित मंत्र्यांना त्या जिल्ह्याचा कारभार प्रत्यक्षपणे पाहता येणार असून सोलापूर व अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या जिल्ह्याचा पदभार देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

त्याचप्रमाणे इतर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची नावे - देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर वर्धा अमरावती भंडारा गडचिरोली, सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर व गोंदिया , चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,  गिरीश महाजन- धुळे लातूर नांदेड, गुलाबराव पाटील- बुलढाणा,  दादा भुसे- नाशिक,  संजय राठोड- यवतमाळ वाशिम , सुरेश खाडे- सांगली, संदिपान भुमरे- औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), उदय सामंत- रत्नागिरी रायगड,तानाजी सावंत- परभणी व उस्मानाबाद, रवींद्र चव्हाण- पालघर सिंधुदुर्ग,  अब्दुल सत्तार- हिंगोली , दीपक केसरकर - मुंबई शहर कोल्हापूर,  अतुल सावे- जालना व बीड, शंभूराजे देसाई- सातारा व ठाणे मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगर .या जिल्ह्यांची जबाबदारी पालकमंत्री म्हणून देण्यात आली आहे.