पंढरपूर तालुक्यात `रात्रीस खेळ चाले`, नागरिकांनी मांडली वाळू चोरीची व्यथा..
------------------------------------------------------------------------------------
महसूल प्रशासन काय करतय ?
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : पंढपूर तालुक्यातील भीमा वमाण नदी पात्रातील वाळूचे अवैद्य रित्या उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक राजरोसपणे केली जात आहे .त्यामुळे प्रत्येक नदी काठाच्या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीस खेळ चाले ही मालिका आपल्या सगळ्यानांच माहिती आहे .आपल्या भागातील अवैध धंद्यांची माहिती त्या भागात नेमणूकीस असणारे प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहीत असते. रात्रीस खेळ चाले ही मालिकाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण पंढरपूर तालुक्यात रात्री कोणता खेळ चालतो हे कोणी जोतीषानी सांगण्याची गरज नाही.
भीमा व माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असून अवैध वाळू उपसा करणारे वाळूमाफियावर पाहिजे तशी जबर कारवाई होत नसल्याने शासनाचा महसुल बुडतो आहे. तालुक्यात पंढरपूर, सरकोली, आंबे, मुंढेवाडी , गोपाळपूर,शेगांव दुमाला, शिरढोण, गुरसाळे, इस बावी या ठिकाणी वाळूचे गावे आहेत, या ठिकाणाहून यारीच्या साह्याने वाळू माफिया कडून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जाते .पण यापैकी एकाचाही लिलाव अद्याप झालेला नाही.
त्यामुळे वाळु माफियांचे फावले असून रात्रीच्या अंधारात सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे.हे रोखण्यासाठी महसूल विभागाने पथके तयार केली, तरीही रात्री वाळू उपसा माफियांकडून सुरूच आहे. कारवाई टाळण्यासाठी अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्राॅली वापरले जातात, ही चिंतेची बाब आहे. वाळू माफियांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळे ते सातत्याने पोलिसांना आव्हान देतात. विशेषतःपोलीस प्रशासनाकडून वारंवार अवैद्य वाळू माफिया वर गुन्हे दाखल केले जात आहे .पण महसूल प्रशासनातील अधिकारी या कारवाईचे वेळी कुठे दिसत नाहीत वाळू उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याची प्रमुख जबाबदारी महसूल ची आहे .तरीसुद्धा पंढरपूर तालुक्यात अवैद्य वाळू उपसा सुरूच आहे ही विशेष , बेकायदेशीर वाळू उपसा करून कोट्यावधी रुपयाची कमाई करणाऱ्या अवैद्य व्यवसायिकांना वरदहस्त कोणाचा याचे उत्तर शोधण्याची खरी गरज आहे .मध्यरात्री ते पहाटे पाच पर्यंत अवैध्य वाळू उपसा केला जातो अनेकदा चोरीच्या मार्गाने वाळू वाहतूक केली जाते याची माहिती अधिकाऱ्यांना देऊ नये कारवाई होत नाही अशी ओरड आहे.
पंढरपूर ग्रामीण पोलीस सांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मागील काही दिवसात अनेकदा कारवाया केल्या आहेत विशेष बाब म्हणजे या कारवाया पंढरपूर तालुक्यातच झाले आहेत .पंढरपूरात चोरी, मारी, गुटखा, अवैध दारू सर्रास सुरू असून हे कधी थांबणार ? असा सवाल तालुक्यातील नागरीकातून केला जात आहे.